Wednesday, 9 July 2025

Lonavla

 लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.


मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.


पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.


लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील शेंगदाणा चिक्की आणि काजू, बदाम यांपासुन बनवलेली चिक्की तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. वर्षाला ५० टन चिक्की निर्यात केली जाते.


No comments:

Post a Comment

Lonavla

  लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे. मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मी...